कोण...?? मी...??
मी...तसं म्हणाल तर एकटा..!
सगळ्यांत राहून, असंख्य लोकांनी वेढलेला असूनही...एकटा..!!
अळवावरच्या थेंबांच्या जातीचा..!
सदैव एकटे,अलिप्त असणारयांची अशी जी एक 'जमात' आहे...त्यांपैकीच एक.
म्हणाल तर...तर खूप काही गोष्टी आहेत.
आम्हा लोकांची कोणाशीही स्पर्धा नाही.
इथे 'एकटेपणा' हा फक्त भाव नाही...तर तेच अस्तित्व आहे.
इतरेजनांसारखं आम्हाला 'वेगळेपण' प्रयत्नपूर्वक दाखवावं लागत नाही...की आवर्जून 'मिळवावं' लागत नाही.
आमच्या कसल्याही मागण्या नाहीत...हेवेदावे नाहीत.
आणि मुख्य म्हणजे minority असूनही आम्हाला कसल्याही 'आरक्शणा'च्या कुबड्यंची गरज नाही.
अभिमान तर आहेच...पण अस्मिता अधिक महत्त्वाची.
इथे 'स्वतःचा' शोध घेता येतो...तेही 'स्वतः'ला न गमावता.
ह्यात 'अलिप्तता' आहे...पण कसलीही 'गुप्तता' नाही.
'मम'भाव आहे...पण कसलाही 'स्वार्थ' नाही.
'वेगळेपण' तर आहेच...पण 'परभाव' मात्र नक्कीच नाही.
आहे...
आहे ती फक्त एक इच्छा...!
हे 'एकटेपण' जपण्यची...अन् मनसोक्त जगण्याची...अखेरपर्यंत.
आहे...हे सगळं असं आहे.
सुरूवातीपासूनच....आणि नेहमीकरता.
No comments:
Post a Comment